*शंकर गायकर यांची नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वी; सांगता सोहळा व कन्यापूजन*
ब्राह्मणवाडा (ता. अकोले) – विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते श्री. शंकर भाऊराव गायकर यांनी आपली द्वितीय नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या निमित्ताने ११ मे रोजी पारंपरिक पद्धतीने परिक्रमा सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमात कन्यापूजन,भव्य भजन संध्या व विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे ३३०० किलोमीटर अंतराची ही परिक्रमा श्री. गायकर यांनी पूर्णतः पायी, केवळ अध्यात्मिक प्रेरणेने, तीन महिन्यांत पूर्ण केली. हिंदू संस्कृती आणि परंपरांच्या जतनासाठी अहर्निश कार्यरत असलेले गायकर हे प्रखर विचारवंत आणि प्रभावी वक्ते म्हणून देशभर परिचित आहेत.
शंकर गायकर हे अहिल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र आहेत. हे गावातील केवळ पुत्र नसून, ते संपूर्ण जिल्ह्याचे अभिमान आहेत.
या यशस्वी परिक्रमेबद्दल केंद्रीय मंत्री,मुख्यमंत्री, खासदार, आमदार तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ब्राह्मणवाडा येथील ग्रामस्थ व गायकर कुटुंबीयांच्या वतीने ब्राह्मणवाडा येथे सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी विविध साधू-संत, धर्मप्रेमी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवमयी कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नर्मदा माता परिक्रमेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सोहळा अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.