*वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न :*
घणसोली (प्रतिनिधी)
आज गुरुवार, दि. १५/०२/२०२४ रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.४२, घणसोली शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सायंकाळच्या वेळेस रंगलेल्या या कार्यक्रमात बालवाडी ते इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती विविध बहारदार गीतांच्या माध्यमातून उत्साहाने सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध राज्यांची संस्कृती प्रतिबिंबित झाली होती.
इयत्ता ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेले विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. घन:श्याम मढवी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. खुशाल चौधरी सर, केंद्र समन्वयक श्री. संजय मोरे सर, सकाळ सत्र प्रमुख श्री. उल्हास पुरव सर, दुपार सत्र प्रमुख संध्या पाटील मॅडम, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. मंगेश शेडगे सर, शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. नितीन भरसट सर व सौ. मेघा कोंपले मॅडम यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक श्री. कैलास कचवे सर व त्यांच्या टीमने सर्व गीतांचे सुंदर नृत्य दिग्दर्शन केले.